महाभारतातील ‘कर्ण‘ या व्यक्तिरेखेवर आधारित शिवाजी सावंत यांनी लिहिलेली कादंबरी. सप्टेंबर २४ १९९५ रोजी या पुस्तकाला ‘भारतीय ज्ञानपीठ’ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला.

महाभारतातील सामान्यत: खलनायक म्हणून परिचित असलेल्या महावीर कर्णाच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा मागोवा ही कादंबरी घेते. बऱ्याच कथा सर्वांनाच परिचित आहेत. नायक असूनही बहुतांशी सगळीकडे तो एक खलनायक भासतो. पण शिवाजी सावंत लिखित “मृत्युंजय ” कादंबरी हाती घेतली आणि जणू कर्णाचे जीवन नव्याने माझ्या मनात उलगडले गेले. कर्णासारखा दानशूर या भूमीवर कधीच नव्हता हे वर रेखाटलेल्या चित्रावरून सिद्ध झालेच. अशा अनेक परिचित अपरिचित प्रसंगांशी आपली अगदी जवळून ओळख करून देते ही कादंबरी.… मराठी साहित्यास शिवाजी सावंत यांसकडून मिळालेली आणखी एक देणगी.

0
Cart
Your Cart is Empty
Fill your cart with amazing items
Shop Now
Select options